HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

बीडमध्ये पुढील ३ दिवस लॉकडाऊन, पोलिस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये

बीड | बीड जिल्ह्यामध्ये उद्यापासून म्हणजेच ५ मेपासून पुढील ३ दिवस लॉकडाऊनलावला आहे. माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आजपासूनच सज्ज झाली आहे. राज्यात हळूहळू एक एक करत काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू केला जात आहे. सांगली, कोल्हापूर. आणि आता बीडमध्येही करण्यात आला आहे.

सकाळी ७ ते ११ या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवेचे दुकानं खुले ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, उद्यापासून तीन दिवस दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्वच दुकानं बंद राहणार असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. वेळ संपल्यानंतर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं होतं. यावेळी भाजी मंडई, कारंजा, बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याबरोबरच जिल्हा रुग्णालय बाहेरील सुरु असलेली दुकानं यावेळी पोलिसांनी बंद केली आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जाते. बीड आणि अंबाजोगाईत १५ केंद्राच्या माध्यमातून जागेवरच अँटीजेन टेस्ट आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जातेय. दरम्यान यावेळी कपड्याचे दुकान त्या बरोबरच इतर दुकान बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दुकान खुली होती, आणि याच दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Related posts

बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल – संजय राऊत

News Desk

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन, ऑफिस जाळून देण्याची दिली धमकी

News Desk

मुख्यमंत्री आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर जाणार

News Desk