HW News Marathi
Covid-19

बुलढाण्यात आजपासून 21 ऑगस्टपर्यंत ‘लॉकडाऊन’

बुलडाणा | राज्यभरात कोरोनाची स्थिती गंभीर होत जात असताना याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात आजपासून (२१ जुलै) पुढचा महिनाभर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज म्हणजेच २१ जुलै ते २१ ऑगस्ट मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण १ महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात येत असून या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.

काय सुरु ? काय बंद ?

सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय इत्यादी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत दुध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. तसेच १ जुलै 2020 च्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी दिनांक ३१ जुलै 2020 पर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक मानवी कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, आंतर जिल्हा वाहतुक / पासधारक वाहने व माल वाहतुक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप २४ तास सुरू राहतील.

नियम काय ?

जिल्ह्यातील लॉकडाउनच्या या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहऱ्यावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसीडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक असणार आहे.

…तर कारवाई होणार !

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तूदेणाऱ्या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये, साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, विधनपरिषदेवर संधी मिळाली तर …!

News Desk

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळणार

News Desk

#LockDown4 : देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

News Desk