HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत २ ते १० जुलै कडक लॉकडाऊन जाहीर

कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रसार खूप वाढत चालला आहे. अशातच कल्याण-डोंबिवलीतही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने २ जुलै ते १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. किराणा मालाची दुकाने फक्त होम डिलिव्हरीसाठी सुरू राहणार आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत होती होती. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या. तसेच नागरिक देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढल्याने १० दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन दरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार?

* इंटरसिटी, एमएसआरटीसी, बस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही. टॅक्सी, रिक्षा यांनाही परवानागी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असेल.

*सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे खासगी वाहनांचे काम बंद. खासगी ऑपरेटर्सचे कामकाज बंद राहणार.

*सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.

*ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्या नियमाचे पालन बंधनकारक, त्या व्यक्तीने अगर तिच्या कुटुंबीयांनी पालन केले नाही तर कारवाई होणार.

*सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ लोकांपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी करण्यास मनाई.

*व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, गोदाम इ. सर्व दुकाने यांचे कामकाज बंद राहणार. मेडिकली संबंधित, सतत प्रक्रिया अशा आवश्यक असलेल्या उत्पादनं आणि उत्पादक युनिट्सना संमती असेल.

*सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचाऱ्यांसह चालवण्याची परवानगी असणार आहे. चेक काऊंटर पासून आणि एकमेकांपासून ३ फूट अंतर ठेवणं बंधनकारक राहील.

*अत्यावश्यक वस्तू, सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनांना वरील प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.

*जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपा इत्यादी खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील.

*मेडिकल स्टोर्स, रुग्णालये, दवाखाने, गॅस सिलेंडर पुरवठा, उद्ववाहन दुरुस्ती यांच्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही.

*दूध विक्रीची दुकाने पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुरु ठेवून विक्री करता येईल.

Related posts

‘गरिबी हटाव’ घोषणेचे रूपांतर आता ‘गरिबी छुपाव’ योजनेत झालेले दिसते !

News Desk

कोरोनावरील उपचारासाठी अशोक चव्हाण लिलावती रुग्णालयात दाखल

News Desk

डोंबिवलीत प्रदुषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याचे मुख्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

अपर्णा गोतपागर