HW News Marathi
Covid-19

कोल्हापुरात पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन

कोल्हापूर | राज्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेत एक एक जिल्हा लॉकडाऊन करत आहे. सांगली नंतर आता कोल्हापूरातही लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात आला आहे. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून (५ मे) पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. ५ मे सकाळी ११ वाजल्यापासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या ११ वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, असे पालकमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीसांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देहविक्रयातील महिलांसाठी यशोमती ठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

News Desk

महाराष्ट्रात तब्बल ७५ दिवसांनंतर एका दिवसात ५ हजारांवर नवे ‘कोरोना’ बाधित

News Desk