HW News Marathi
Covid-19

पुणे जिल्ह्यात १० दिवसांचा लाॅकडाऊन,काय चालु काय बंद जाणून घ्या

पुणे | पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १३ जुलैपासून पुण्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या संबंधी अधिक माहिती देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या पुणे विभागात एकूण कोरोनाबाधित ४२,४३३ इतके आहेत तर १५,५२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि पुण्यात २५,५०७ जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली. आज झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित.

पुण्यातील वाढती संख्या लक्षात घेता १३ जुलैला रात्री १२ वाजल्यापासून पुढील १० दिवस लॉकडाऊन असणार आहे. १३ जुलै ते १८ जुलै अतिशय कडक लॉकडाऊन असणार आहे. केवळ दूध विक्री, दवाखाने आणि अत्यावशक सेवा सुरू राहणार आहेत. या कालावधीत अन्य काहीही सुरू राहणार नाही.

१९ जुलैपासून काही काळासाठी नवे नियम लागू होतील. ते कोणते असणार याबाबत लवकरच माहिती दिली जाणार आहे. लाॅकडाऊन काळात ऑनलाईन पास केवळ अत्यावश्यक बाबीसाठीच मिळणार आहेत. दरम्यान, या काळात पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तसेच, सरकारी कार्यालयांसाठी आदेश लवकरच येतील, असेही त्यांनी सांगितले.

१३ जुलैपासून सुरू होणारा लॉकडाऊन २४ जुलैला सकाळी संपणार आहे.लाॅकडाऊन लागू होण्यापूर्वी पुढील ३ दिवस सर्व महत्वाच्या वस्तू नागरिकांनी खरेदी करून घ्याव्यात असे आयुक्तांनी आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन

News Desk

ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk

काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ रुग्णवाहिका व ६१ लाख मास्कचे वाटप करणार !

News Desk