HW News Marathi
Covid-19

मीरा- भाईंदर, ठाणेमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

ठाणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातल्या अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता.  ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला आहे. या दोन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये असलेल्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही महापालिकांच्या हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असेल. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे दोन्ही महापालिकांमधल्या आयुक्तांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. लॉकडाऊनला विरोध होत असला तरी दडपणाला बळी पडू नका, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत घेतली. गरज असेल तर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही”, रोहित पवारांची टीका

News Desk

“तुझ्या बापाला” हे ट्विट मी नव्हे तर एका संतप्त शिवसैनिकाने केले ! महापौरांचे स्पष्टीकरण

News Desk

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk