यवतमाळ | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या १० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.
तसेच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची शनिवारची सभाही रद्द करण्यात आली आहे. त्यासंबंधी माहिती देणारा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यास मनाई राहणार आहे
यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या ३ ठिकाणांहून प्रतिदिन प्रत्येकी ५०० याप्रमाणे दिवसाला १५०० नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.