HW News Marathi
Covid-19

#Lockdown3 : देशातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला

नवी दिल्ली | देशात कोरोनचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधी अजून २ आठवडे वाढवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. देशातील हा तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालवधी वाढवला आहे. देशातील तिसऱ्या लॉकडाऊनच्या कालावधी देशात ४ मेपासून ते १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यालयाने पत्र प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१ मे) मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी ३ मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५,०४३ वर जाऊन पोहोचला आहे. तर ६०० कोरोनमुक्त झाले आहेत. देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. त्यांपैकी रेड आणि ऑरेंज झोन्सकडे विशेष लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ओळखा पाहू कोण?” अमृता फडणवीसांची नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळीही २८०० च्या खाली

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ५३,६०१ नवे रुग्ण !

News Desk