HW News Marathi
देश / विदेश

बॉक्सर लव्हलिना कांस्यपदकाची मानकरी!

टोक्यो | भारताला अजून एक पदक मिळालं आहे. बॉक्सर लव्हलिनाला कांस्यपदक मिळालं आहे. उपांत्य फेरीत लवलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलाने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते.

भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके

भारत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लोव्हलिनाने चांगली लढत दिली. लोव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.

कमलप्रीत कौरला कांस्यपदक

टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळवलं असून आज अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा होती. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत ६३.७० मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.

हॉकी संघाला रौप्यपदक

आतापर्यंत भारताला दोन पदकं मिळाली असून तिसरं पदक निश्चित झालं आहे. यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवलं आहे. तर दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. कोणत्याच स्पर्धेत यश न मिळवता आलेल्या भारतीय संघाला उलट सुवर्णपदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या पुरुष हॉकी स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. हॉकी, एथलेटिक्ससह कुस्तीच्या मैदानातही भारतीयांनी आज नशीब आजमवलं पण सर्वत्र पदरी निराशाच पडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातल्या व्यापारी संघटनांनकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक

News Desk

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk