मुंबई | मुंबईतील माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आज (१५ सप्टेंबर) अटक केलेल्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याच्या कारणावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मुंबईत मारहाण करण्यात आली होती. यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी६ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली होती.मात्र, या सगळ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे.
Matter of Madan Sharma, ex-Navy officer who alleged he was beaten up by Shiv Sena workers in Mumbai: Samta Nagar Police invokes IPC sec 452 (House-trespass after preparation for hurt, assault or wrongful restraint) in FIR, 6 re-arrested last night and produced before court today.
— ANI (@ANI) September 15, 2020
निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी ६जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली होती. तसेच, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडेही याबाबत लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.