HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी वारीच्या यात्रेवर निर्बंध

पंढरपूर | आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीला लेकूरवाळी विठ्ठू माऊली एकटीच असणार आहे. लाखो वैष्णवांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारीला माघी एकादशी आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते २३ फेब्रुवारीला बारापर्यंत पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपुर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिराने पारित केले.

माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे, शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने काढण्यात आले आहेत. तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. परंतु या प्रवासी सेवेतून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे तथा शहरात प्रवेश नसेल. ही सेवा केवळ तातडीची आपत्कालीन सेवा राहील. असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

News Desk

कोल्हापूरातील भाजपचा ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल,चंद्रकांत पाटलांना धक्का!

News Desk