HW News Marathi
देश / विदेश

महाविकासआघाडी अन् भाजपमध्ये पुन्हा जुंपली, संदीप सिंहवरुन अनेक सवाल उपस्थित 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून देशासह राज्यात वारंवार राजकारण होत आहे. या प्रकरणाशी संबंधित संदीप सिंहशी महाराष्ट्र भाजपतील काही बड्या नेत्यांचा संबंध असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने भाजपला लक्ष केले आहे. संदीप सिंहचा भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. याचवरून, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला धारेवर धरले आहे. “भाजप संदीप सिंहला इतकं महत्त्व का देत आहे ? पंतप्रधान मोदींच्या बायोपिकचे काम भाजपने संदीप सिंहला का दिलं?”,असे सवाल उपस्थित करत सचिन सावंत यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

“भाजप संदीप सिंहला इतकं महत्त्व का देत आहे ? पंतप्रधान मोदींच्या बायोपिकचे काम भाजपने संदीप सिंहला का दिलं? संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात 53 वेळा कॉल केल्याचंही उघड झालं आहे. गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत 177 कोटी रुपयांचा MOU केला होता. या सगळ्याची उत्तरं आता भाजपने देणं आवश्यक आहे”, अशी मागणी आता सचिन सावंत यांनी केली आहे. दरम्यान, सचिन सावंत यांच्या या ट्विटनंतर भाजप आमदार राम कदम हे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. संदीप सिंहवरून भाजपवर केलेले आरोप अत्यंत बिनबुडाचे आणि बाळबोध असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. तसेच राम कदम यांनी उलट महाराष्ट्र सरकारलाच काही प्रश्न उपस्थित करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

“रिया चक्रवर्ती आणि महाराष्ट्र सरकारचं नातं काय आहे? रियाचे प्रवक्ते असल्यासारखं महाराष्ट्रातील नेते बोलत आहेत. या ६५ दिवसात हे सरकार नेमकं कुणाला वाचवत आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून, अशा पद्धतीचे आरोप करणं हे अत्यंत बाळबोध आहे”, असे राम कदम यांनी म्हटले आहे. सुरुवातीपासूनच राज्यात सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून भाजप महाराष्ट्राकडून राज्यातील महाविकासआघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंना आमदार करू नका ! अंजली दमानीयांची राज्यपालांकडे धाव  

News Desk

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

News Desk

प्रवाशांचा प्रतिसाद येत नसल्याने तेजस एक्सप्रेस बंद होणार!

News Desk