पालघर | पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज सकाळी (२५ जुलै) पहाटे दीडच्या सुमारास मोठा धक्का बसला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार ३.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. या भूकंपामुळे डहाणूतील नागझरी गावातील एक घर कोसळले असून यात त्या घरातील ५५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. रिश्या मेघवाले असे या महिलेचे नाव आहे.
Maharashtra: A 55-year-old woman died in Dahanu area of Palghar district after wall of a house collapsed on her, in the earthquake last night. https://t.co/HoPZC7sV1z
— ANI (@ANI) July 25, 2019
डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाड पर्यंत या भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने या परिसरातील नागरिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काहींनी रात्र घराबाहेर रस्त्यावर जागून काढली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.