May 24, 2019
HW Marathi
महाराष्ट्र

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला जमीनदोस्त

अलिबाग । पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,००० कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरा व्यापरी नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव समुद्र किनारी असलेला आलिशान बंगला आज (८ मार्च) सकाळी ९ वाजातच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला आहे. मोदीचा हा बंगला पाडण्यासाठी १०० डायनामाइट्स वापरण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील २५ जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले होते की, नीरव मोदींचा बंगला मजबूत असून तो उद्ध्वस्त करणे शक्य नाही. त्यामुळे डायनामाइट्सच्या सहाय्याने स्फोट घडवून हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.
या कारवाईच्या वेळी ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. बंगल्याच्या विविध भागात अशा एकूण १०० डायनामाइट्स लावण्याचे काम काल (७ मार्च) पूर्ण केले होते. यानंतर फक्त आज सकाळी स्फोट करून हा बंगला जमीनदोस्त केला आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related posts

राज्यभरात १६ नोव्हेंबरपासून ‘मराठा संवाद यात्रा’

Gauri Tilekar

विरोधीपक्षाचे 19 आमदार निलंबित

News Desk

११ जूनपर्यंत बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 

News Desk