HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनला देखील टाकले मागे!

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थीती सध्या बिकट होत चालली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५,९७५ वर पोहोचली तर चीनमध्ये ही संख्या ८३,०३६ इतकी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बाधितांच्या एकूण संख्येपैकी अर्ध्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट ४५.७२ टक्के इतका आहे.

सर्वात चिंताजनक बाब ही मुंबईमध्ये आहे. मुंबईत एकूण रुग्णसंख्या ही ४८,७७४ वर पोहोचली आहे. तर केवळ मुंबईत १,६३८ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत राज्यातील ५ लाख ५१६४७ लोकांचे नमूने तपासण्यात आले. त्यापैकी ८५ हजार ९७५ लोकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या एकूण चाचण्यांच्या संख्येच्या १५.५८ टक्के इतकी आहे. आतापर्यंत चीनमध्ये ८३ ०३६ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यापैकी हुबेई प्रांतातच ६८ हजार ग्रस्तांची नोंद झाली. तर या ठिकाणी आतापर्यंत ४ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टेस्टींगसह लसीकरणाचा वेग वाढवावा; धोका कमी पण कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार! – छगन भुजबळ

Aprna

माझा पत्ता राज्यातील नेत्यांनीच कट केला, खडसेंचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका

News Desk

राज्यातील लॉकडाऊनच्या गोंधळावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk