HW News Marathi
महाराष्ट्र

आज दहावीचा निकाल, बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता पहा

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज (८ जून) लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दहावीच्या परिक्षेसाठी एकूण १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राज्यात दहावीची परिक्षा राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ मार्च ते २२ मार्च दरम्यान घेण्यात आली. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संपादित केलेल्या गुणांच्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे.

याठिकाणी पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

https://www.maharshtraeducation.com

‘एसएमएस’नेही समजणार निकाल

दहावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHSSC स्पेस सीट नंबर टाकून त्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना निकाल समजणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच यक्ष प्रश्न”, महापौरांचा टोला

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

News Desk

“पराभूत झालो तरी संपलो नाही”, पंढरपूरच्या निकालानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk