HW News Marathi
महाराष्ट्र

रिया चक्रवर्तीचा हायकोर्टाकडून जामीन मंजूर!

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मिळाला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट अमलीपदार्थ विरोधी पथकाकडे (एनसीबी) जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशातंच्या आत्महत्या प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शौविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडू द्यावी । उदयनराजे भोसले 

swarit

#Hinganghat Live Update : पीडित तरुणी अनंतात विलीन

swarit

महाविकासआघडीमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, नरेंद्र पाटलांचा खरमरीत सवाल

News Desk