HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत मोदी-सोनिया गांधीची घेणार भेट

नवी दिल्ली । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२१ फेब्रुवारी) दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दोघांची भेट घेणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवीन घरोबा करत राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ५.३० वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी संध्याकाळी ७:३० वाजता त्यांच्या निवसस्थानी जावून त्यांची सदिच्छा भेट असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत माहिती दिली असून तसेच राजकीय रंग न देण्याचे आवाहन ट्विटरवरुन केले होते.

उद्धव ठाकरे यांच्या सोनिया गांधी यांच्यासोबत ते नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. महाविकास आघीडीतील समन्वय राखण्याासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचे बोलले जातेय. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts

नववी-दहावीत आता तोंडी परीक्षा नाही  

News Desk

दूध-अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

News Desk

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk