HW News Marathi
महाराष्ट्र

नोकरी नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा हजारच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. निवृत्त सैनिक ज्यांनी आरोग्य सेवेशी संबंधित काम केले आहे, निवृत्त पारिचरिका तसेच प्रशिक्षित मात्र अजून नोकर नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी यावे. प्रशिक्षण घेतलेल्या अशा कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी समोर यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी Covidyoddha@gmail.com यावर संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी आज (८ एप्रिल) सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधाला.

केंद्राने जे राज्य सरकारला दिले ते वाटतोय, पण केंद्राने सगळेच दिलेय, असा गैरसमज करू नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारव निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे,असे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी काल (७ एप्रिल) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आमचे काही फोटो आले, सर्वजण मास्क लावून, अंतर ठेवून बसले होते. कदाचित व्हिडीओ कॉन्फरन्सने घेतलेली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात होते, त्या सर्वांचे धन्यवाद दिले सर्वांच्या सूचना येत आहेत, सर्वजण टीमवर्क करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे.

जीवनावश्यक वस्तूसाठी तुम्ही बाहेर जाणार आहात. तर तुम्ही मास्क वापर हे अत्यावश्यक आहे. तुम्ही तुमचा मास्क घरच्या घरी बनवू शकात, तुम्हा वापरलेला मास्क आपापला स्वच्छ धून वापरा करावा, पुन्हा वापरावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

  • आता रुग्ण येण्याची वाट पाहत नाही. घरोघरी जाऊन तपासणी सुरू झाली आहे
  • मुंबईत थोडे काळजीची परिस्थिती आहे. मात्र, इथे चाचण्या वाढवल्या आहेत
  • आता रुग्ण येण्याची वाट पाहत नाही. घरोघरी जाऊन तपासणी सुरू झाली आहे
  • आतापर्यंत मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ६४ आहे
  • ज्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे नाहीत असे ६१० लोक आहेत
  • आतापर्यंत १७ हजारांच्या आसपास चाचण्या
  • राज्यातील आरोग्य सेवा चार भागांमध्ये विभागण्याचा प्रयत्न आहे
  • रक्तदाब, मधुमेह व किडनीचे विकार असलेल्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय अशी विभागणी असेल
  • फिव्हर क्लिनिकमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची तपासणी केली जाईल आणि गरजेनुसार त्यांना पुढचा सल्ला दिला जाईल
  • प्रत्येकाने स्वतंत्र मास्क वापरावा. छत्रीसारखा सर्वांनी एकाचा वापर करू नका
  • जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडतानाही मास्क वापरा. हे संकट गेल्यानंतरही काही दिवस वापरा
  • एन ९५ मास्क, पीपीपी किट, व्हेंटिलेटर अशा सगळ्या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे. त्याची उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
  • महाराष्ट्रला तुमची गरज आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
  • घराच्या घरी मास्क बनवा, आपापला स्वच्छ धून वापरा करावा
  • घराबाहेर पडताना मास्क वापरा
  • साडे-पाच लाख लोकांना सरकार अन्न पुरविते
  • हे युद्ध आपण जिंकणार आहोत
  • केंद्र सरकारच्या योजनेत फक्त तांदूळ आहेत. तेही केवळ लाभार्थ्यांसाठी आहे. के
  • माणुसकी धर्मातून सरकार काम करतेय
  • राज्यातील मंत्रीही सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत.
  • मात्र, आमच्यामध्ये सतत संवाद आहे. संघभावनेने आम्ही काम करतोय
  • शक्य असल्यास घरात व्यायाम करा
  • घरा राहा, सुरक्षित राहा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”,उर्जामंत्री भडकले!

News Desk

…तर ‘अनिल देशमुख’ करु, ‘भुजबळ’ करु या भाजपच्या धमक्या म्हणजे गुंड, राडा प्रवृत्ती !

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit