मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच खातेवाटप जाहीर केले आहे. यानंतर आता ठाकरे सरकारने कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. काल (८ जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे तर आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील.
तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोलीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असतील. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांची नियुक्ती केली आहे. तसेच कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळाले आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय रविंद्र सामंत यांच्याकडे तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल दत्तात्रय परब यांना देण्यात आले आहे.
हे आहेत ३६ दिल्याचे नवे पालकमंत्री
१. पुणे- अजित अनंतराव पवार
२. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
३. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
४. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
५. रायगड – आदिती सुनिल तटकरे
६. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
७. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
८. पालघर- दादाजी दगडू भुसे
९. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
१०. धुळे- अब्दुल नबी सत्तार
११. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
१२. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
१३. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
१४. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
१५. सांगली- जयंत राजाराम पाटील
१६. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
१७. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
१८. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
१९. जालना- राजेश अंकुशराव टोपे
२०. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
२१. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
२२. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
२३. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
२४. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
२५. लातूर- अमित विलासराव देशमुख
२६. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
२७. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
२८. वाशिम- शंभुराजे शिवाजीराव देसाई
२९. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
३०. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
३१. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
३२. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
३३. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
३४. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
४५. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
३६. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.