मुंबई | कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जनतेने घरा राहा बाहेर बडून नका, असे आवाहन वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे शुभेच्छा देत राज्यातील जनतेशी हलक्याफुलक्या गप्पा मारल्या. मुख्यमंत्री म्हणाले, “करोनाच्या संकटामुळे आज अनेक सकारात्मक गोष्टी दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनी कुटुंबे एकत्र आली आहेत. आई-वडील, मुले, नातवेड सगळे एकत्र आलेत. अनेक जण आपले छंद पूर्ण करून घेताहेत. आजपर्यंत जे गमावले होते, ते पुन्हा मिळताना दिसतेय,” असे मुख्यमंत्री म्हणाले. “मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
#WATCH Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: I am at home listening to Mrs CM, you listen to your home minister. #COVID19 pic.twitter.com/yl4AokjqA3
— ANI (@ANI) March 25, 2020
“कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करु नका,” अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले. “आज मी तुम्हाला निगेटिव्ह काहीच सांगण्यासाठी आलेलो नाही, मी केवळ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. काल रात्री थोडी धावपळ झाली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गप्पा मारण्यास सुरुवात केली. एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. १९७१ चे युद्ध आपण लक्षात ठेवले पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेशी हलक्याफुलक्या गप्पा मारतात, ते कोरोनाच्या संकटाचीही जाणीव करु देत होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, “आता केंद्र सरकार एसी बंद करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही ते आधीच केले आहेत, इकडे अधीपासूनच चला हवा येऊ द्या, सुरु आहे.लोकांनी घरात राहा, असे आवाहन सर्वजण करत आहेत. सध्या मी देखील घरात आहे, मग घरात राहू काय करायचे, असे प्रश्नही मला लोकांनी विचारतात, मी सांगतो, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका,ठ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेले भीतीचे आणि चिंतेचे वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.