HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

आरेतील मेट्रो कारशेडला विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे

मुंबई। आरे मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांनावर गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात तरुणांनी आंदोलन केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २ हजार ६४६ झाडे तोडण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू झाला होता. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधा दर्शविला होता. तसेच राज्यात सरकार आल्यास आरेला जंगल घोषीत करण्याचेही शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. यावेळी मेट्रोचे काम सुरु असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आगामी एक-दोन दिवसात खाते वाटप करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

भीमा कोरेगाव आणि नाणार आंदोलनाचे केसे मागे घेण्याची मागणी

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आरेचे आंदोलन करणारे सुटले, आता भीमा कोरेगावमधील आंदोलनावेळी मागील सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत अशी मागणी केली. आव्हाड यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नितेश राणे यांनीही आरेतील आंदोलनाचे केसेस मागे घेतले, आता नाणार आंदोलनाचे केसेस पण परत घ्यावेत, तेही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे.

Related posts

मोदींनी ‘आयएनएस विराट’प्रकरणी राजीव गांधींवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे !

News Desk

रामदेव बाबांना पुन्हा देशाच्या वाढत्या लोकसंख्येची चिंता !

News Desk

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

News Desk