HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍यावरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून त्यांनी आरेच्या जंगलातील जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

नाणार येथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात होता. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन देखील छेडले होते. नाणार रिफायनरी

नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मुंबईत विधानभवनातून थेट दिल्लीपर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मग आरेतील येथील कारशेडला विरोध करत जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतले त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी नाणार येथील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारवासियांना मोठा दिलासा दिला आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

Related posts

#MaharashtraElections2019 | बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप, संदीप क्षीरसागर आक्रमक

News Desk

अजित पवार यांनी वारकऱ्यांबाबतही राजकारण केले !

News Desk

विलासराव नावाचं विद्यापीठ 

News Desk