HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी त्यांच्या नावाची पाटी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर लागली असून उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी आज (२९ नोव्हेंबर) दुपारी एक वाजता मंत्रालयातील शिवरायांना वंदन करून पदभार स्वीकारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी मंत्रालयात एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर काल (२८ नोव्हेंबर) तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या राजयगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. यात रायगड संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राजगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपयांची तरतुद करण्याची घोषणा केल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्गार परिषद प्रकरण : एनआयएच्या अर्जावर १४ फेब्रुवारीला सुनावणी

swarit

कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

News Desk