HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

‘सीएए’ला घाबरण्याची गरज नाही !

नवी दिल्ली | सीएएला घाबरण्याची गरज नाही, सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सीएएला जाहीर  पाठिंबा दिला. राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली जावून भेट घेतली आहे. मोदी म्हणाले की, पंतप्रधानांकडून राज्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन असून राज्य सरकार आणि केंद्रमध्ये कोणताही वादी नाही, असेही मुख्यमंत्रीनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, एनआरसी संपूर्ण देशात लागू न करण्याची केंद्राची भूमिका, असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिली आहे. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मोदींच्या भेटीनंतर  उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवसस्थानी पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे

 • सीएएला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला
 • राज्याचा निधी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
 • राज्य सरकार आणि केंद्रमध्ये कोणताही वादी नाही
 • सीएएला घाबरायची गरज नाही
 • राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद नाही
 • जीएसटीचे पैसे वेळेत मिळावेत अशी आमची मागणी
 • एनआरसी संपूर्ण देशात लागू न करण्याची केंद्राची भूमिका
 • सीएएला घाबरण्यीच गरज नाही
 • एनपीआरमुळे कुणालाही नुकसान नाही, एनपीआर आक्षेपार्ह निघाले तरी विरोध करू
 • पंतप्रधानांकडून राज्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे वचन केले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या १८ व १९ एप्रिल  रोजीच्या परीक्षांच्या तारखेत बदल                     

News Desk

आता सागरी मार्गाने देशात शिरण्यासाठी दहशवाद्यांचे प्रशिक्षण सुरू !

News Desk

राज्यात कोरोनाचा एकही पोसिटीव्ह रुग्ण नाही | आरोग्यमंत्री