HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिना निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज ध्वजारोहण होणार आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांवर १२ नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी झाली आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम काम करत होते. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते.

मुख्यमंत्र्यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझगावमध्ये पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महाराणा प्रताम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील फुटबॉल स्टेडियमचे देखीन अनावरण केले आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची सर्जरी झाल्यामुळे यंदाचे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते. मात्र, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री गैरहजर होते. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदाचा कार्यभार काही दिवसांसाठी दुसऱ्याकडे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवावा, असा टोला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री आदित्य ठाकरेंनी मेट्रो कारशेड जागेची केली पाहणी

News Desk

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार – सर्वोच्च न्यायालय

Aprna

ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचं रावसाहेब दानववेंचं महत्त्वपूर्ण विधान!

News Desk