HW News Marathi
Covid-19

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषदेच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (११ मे) अर्ज दाखल करताना त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आणि मुलगा तेजस ठाकरे कुटुंबीयांसह महाविकासआघाडीचे काही नेते मंडळी देखील उपस्थित होती. उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

उद्धव ठाकरेंची ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. येत्या २१ मे रोजी ९ जागासाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसने दोन उमेवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराज व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र, काँग्रेसने एक उमेदवार मागे घेण्यासाठी महाविकासआघाडीची काल (१० मे) सह्याद्री अतिगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली की, “महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी पाच जागांवर विधानपरिषदेची निवडणूक लढवणार आहे. यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोधी होणार आहे.”

विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे

  • भाजप – माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे
  • शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी
  • काँग्रेस – राजेश राठोड

विधानपरिषदेतील असे आहे संख्याबळ

विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, आणि शिवसेना १ अशा एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणू जिंकून येण्यासाठी २९ मते आवश्यक आहेत. तर महाविकास आघाडीला विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. महाविकासआघाडीने विश्वदर्शक ठरावा वेळी १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. मात्र, भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे एकून ११५ सदस्यांचा पाठिंबा आहेत. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची कमतरता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे तीन सदस्य निवृत्त झाले. तर विधानसभेत निवडून आलेल्या ५४ व अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते सहज जिंकून येतील. तर काँग्रेस ४४ सदस्या असून त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राज्यात लॉकडाऊन करायचा असल्यास केंद्राची परवानगी लागणार

News Desk

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा

News Desk

देशातील लोकांना लस देण्याऐवजी लसीचे डोस इतर देशांना दान करत आहोत, उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

News Desk