मुंबई | राज्यात लोकल ट्रेन आणि बस सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. लोकल ट्रेन आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्या बंद करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१७ मार्च) सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनटेची बैठक बोलविली होती.
Maharashtra CM Uddhav Thackeray: Trains and buses are essential services so we are not stopping them as of now but if people don't listen to our advice and don't avoid unnecessary travel, then we will think about that too. Next 15-20 days are very crucial for us. #Coronavirus https://t.co/hXumGcPxq8
— ANI (@ANI) March 17, 2020
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, नागरिकांनी गर्दी कमी केली नाही तर लोकल सेवा बंद करावी लागेल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याभराची सुट्टी दिलेली नाही. मात्र, सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यावर विचार करू, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर केली आहे तर १ कोरोना रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये २४ पुरुष आणि १६ महिला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच कोरोनाग्रस्त झालेल्या फक्त १ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच राज्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशी आहे
- पुणे – १७
- मुंबई – ६, कस्तुरबा रुग्णालयात १ रुग्णाचा मृत्यू
- नागपूर- ४
- यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येक ३,
- रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद – प्रत्येकी १
एकूण ४० रुग्ण
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.