मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६,७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१९ मृत्यूंची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये ४,०६७ रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची आत्तापर्यंत संख्या १ लाख २७ हजार २५९ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के इतका झाला आहे.
6875 new #COVID19 positive cases, 219 deaths, 4067 recovered in Maharashtra today. The total number of positive cases in the state rises to 2,30,599 including 1,27,259 recovered, 93,652 active cases and 9,667 deaths: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/h84JgvhuP5
— ANI (@ANI) July 9, 2020
सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.