HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २७३९ नवे कोरोना रुग्ण, तर २२३४ कोरोनामुक्त

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज ( ६ जून) राज्यात २७३९ कोरोना रुग्णांची वाढ झाली. सध्या राज्यात ८२,९६८ कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे, आज नवीन २२३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७,३९० इतकी झाली आहे.

तसेच, सध्या राज्यात एकूण ४२,६०० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. समितीमार्फत सात दिवसात दर निश्चित केले जातील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी

News Desk

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३, तर प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

News Desk

पायी प्रवास करत मंजूर घराकडे निघाले अन् कोरोना महामारीचे चित्र बनले !

News Desk