HW News Marathi
Covid-19

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ८,३६९ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच, कोरोनामुळे २४६ जणांचा मृत्यू झाला आहे सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मुंबईत (२३,७०४), ठाणे जिल्हा (३६,२१९)तर पुणे जिल्ह्य़ात ३६८१० रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई (९९२), पुणे (१६७८), पिंपरी-चिंचवड (७०८), कल्याण-डोंबिवली (३०४), ठाणे (२१२) रुग्ण आढळले. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्ण जास्त आढळत आहेत.
राज्यात आज ८३६९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३२७०३१ अशी झाली आहे. काल (२१ जुलै) नवीन ७१८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८२२१७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३२२३६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशात सलग पाचव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये ३० हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ५५ हजार १९१ झाली आहे. देशातील मृतांचा आकडा २८ हजार ८४ वर पोहोचला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांनो हे कधीही न पाहिलेले चक्रीवादळ, विनाकारण घराबाहेर पडू नका !

News Desk

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचा शिवसेना खासदाराच्या कन्येशी विवाह संपन्न

News Desk

देशात 38 हजार 792 नवे रुग्ण आढळले

News Desk