मुंबई | राज्यात आज (११ ऑगस्ट) ११,०८८ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या ५,३५,६०१ इतकी झाली आहे. तर मुंबईत ९१७ नवे रुग्ण आढळले आहेत. आणि ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण रुग्ण संख्या १,२५,२३९ इतकी झाली आहे.
917 new #COVID19 cases and 48 deaths reported in Mumbai today. Total number of cases now at 1,25,239 including 99,147 recovered/discharged cases, 18,905 active cases and 6,890 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/Hk2a2psIrl
— ANI (@ANI) August 11, 2020
मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य सरकारकडून येत्या चार दिवसांत याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मास्क आणि सॅनिटायझर सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात उपलब्ध असतील.
11,088 new #COVID19 cases reported in Maharashtra taking the total number of cases in the State to 5,35,601. There are 1,48,553 active cases and the death toll is at 18,306: State Health Department pic.twitter.com/WnzcdNY3SN
— ANI (@ANI) August 11, 2020
काहीजण अव्वाच्या सव्वा भावात मास्क विकत आहेत. मात्र, मास्कच्या क्वालिटीनुसार आम्ही दर नियंत्रित करणार आहोत. तसेच कोरोनाच्या चाचणीचे दरही आपण १९०० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. तर घरी जाऊन चाचणी करण्यासाठी नागरिकांना २४०० ते २५०० रुपये मोजावे लागतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.