मुंबई | राज्यात आज (१ जुलै) दिवसभरात ५,५३७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १९८ जणांनी आज आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १,८०,२९८ इतकी झाली आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात ९३,१५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ८,०५३ जणांचा आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
198 deaths and 5,537 new COVID19 cases reported in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 1,80,298 including 79,075 active cases, 93,154 recovered cases and 8053 deaths: State Health Department pic.twitter.com/HkxwqfiGVv
— ANI (@ANI) July 1, 2020
दरम्यान, राज्यात रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज शासन निर्णय जाहीर केला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज शासन निर्णय जाहीर केला आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.