मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे.
Maharashtra reports 48,621 new COVID19 positive cases, 59,500 discharges, and 567 deaths
Active cases: 6,56,870
Deaths: 70,851 pic.twitter.com/yWpQv4cvpU— ANI (@ANI) May 3, 2021
राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.