HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंच्या घरी ED चा छापा, पाच तासाच्या चौकशीनंतर घेतले ताब्यात

मुंबई | नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकली आहे.  सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या पथकांने आज (३१ मार्च) सकाळी उके यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापेमारी करून झाडाझडती सुरू केली आहे. उके हे फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बाजुने केस लढवत होती. त्याचबरोबर उकेंनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती.  दरम्यान, उकेंच्या घरी ईडीने टाकलेल्या छापेमारीत एक लॉपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. 

उकेंनी नेहमी भाजपच्या विरोधात आरोप केले असून त्यांना न्यायमुर्ती लोया मृत्यू प्रकरणात त्यांनी गंभीर आरोप करत होते. उकेंनी फडणवीसांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप केला होता. उकेंनी लोया मृत्यू प्रकरणी अनेक आरोप केले होते. ईडीने उकेंच्या घरी जमीन खरेदी प्रकरणात तपासासाठी छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. उकेंनी ६० वर्षीय वृद्ध महिलेला धमकावून जमीन नावावर केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. ईडीने आज सकाळी उकेंच्या घरी छापा टाकल्यानंतर पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk

भाजपचे नेते बोलल्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते याचा अर्थ ….!

News Desk

खडसेंनी फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं, भाजपची खडसें विरोधात आक्रमक भूमिका!

News Desk