मुंबई | महाराष्ट्रात 18 मार्चला 45 असणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 47 झाला आहे. काल पुणे,पिंपरी-चिंचवड आणि मुंबईमध्ये कोरोनाचे 3 रूग्ण आढळून आले होते. आज पुन्हा हा आकडा वाढला आहे. महाराष्ट्रात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. मुंबईतील 22 वर्षीय महिला इंग्लंडवरुन परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.
Maharashtra Health Ministry: A 22-yr-old woman tested positive for #COVID19 in Mumbai; has travel history to United Kingdom. One more person, a 49-year-old woman from Ulhasnagar tested positive today; has travel history to Dubai. Total no. of positive cases reaches 47 in state. pic.twitter.com/5yMVzlaSMD
— ANI (@ANI) March 19, 2020
महाराष्ट्र राज्यात कोरोना रूग्णांची संख्या -47
पुणे- 19
मुंबई -9
नागपुर -4
यवतमाळ -3
नवी मुंबई – 3
कल्याण- 3
रायगड – 1
अहमदनगर-1
औरंगाबाद- 1
रत्नागिरी – 1
ठाणे-1
उल्हासनगर -1
47 रूग्णांपैकी एका रूग्णाचा मुंबईमध्ये मृत्यु झाला आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.