HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्र शासनाचं लष्कराला पत्र ,अजित पवारांची माहिती ..

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सध्या तत्परतेने आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सैन्यदलाला पत्र लिहिले असून वैद्यकिय मदतीची मागणी लष्कराकडे करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

काल यांसंबंधीचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. कर्तव्य बजावणा-या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांवरील हल्ल्याच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणा-यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

News Desk

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत ६२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk