HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ‘कोरोना’चा दुसरा बळी, रुग्णांची संख्या ७४ वर

मुंबई | कोरोना प्रादुर्भाव राज्यात वाढला असून राज्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. ६३ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आज (२२ मार्च) मुंबई ६ तर पुण्यात ४ असे १० कोरोना पॉझिटिव्हि रुग्णा अढळून आले आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर गेला आहे. तर संपूर्ण देशभरात ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात शनिवारी (२१ मार्च) कोरोनाचे पुण्यात २, मुंबईत ८, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी १ असे १२ नवीन रुग्ण शनिवारी आढळले होते.

राज्यात अशी आहे कोरोनाग्रस्तांची संख्या

  • पुणे – २७
  • मुंबई – २५
  • नागपूर- ४
  • यवतमाळ – ४
  • नवी मुंबई – ३
  • कल्याण – ४
  • अहमदनगर – २
  • रायगड – १
  • ठाणे – १
  • उल्हासनगर – १
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १

एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या – ७४

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – ११ मार्च
  • दिल्ली – ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू (१) – १३ मार्च
  • मुंबई – ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १७ मार्च
  • पंजाब – ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – १९ मार्च
  • महाराष्ट्र – ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (१) – २२ मार्च

एकूण – ५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : चारीही आरोपींना एकत्रित फाशी देण्याच्या याचिकेवर ११ फेब्रुवारीला सुनावणी

swarit

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

News Desk

‘कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांशी संवाद!

News Desk