HW News Marathi
Covid-19

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी | राजेश टोपे

मुंबई | राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल (२५ जून) एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. कालही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. काल सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, प्रायव्हेट लॅब्समध्ये आता फक्त २२०० रुपयांत कोरोना चाचणी

News Desk

रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा !

News Desk

जाणून घ्या…भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवारी मिळालेल्या रमेश कराड यांच्याबद्दल

News Desk