मुंबई | योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करणारे औषध लाँच केले होते. पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या जाहिरातीवर आयुष्य मंत्रालयाने बंदी आणली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. अनिल देशमुख यांनी काल (२४ जून) पंतजलीच्या औषधासंदर्भात ट्वीट करत म्हटले, महाराष्ट्रात पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे सांगितले आहे.
The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved's 'Coronil' were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won't allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020
अनिल देशमुख म्हटले, “कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाहीय. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे.” या ट्वीटमध्ये अनिल देशमुख यांनी रामदेव बाबा यांना टॅग केले आहे. तसेच #MaharashtraGovtCares आणि #NoPlayingWithLives , असे हॅशटॅग वापरले आले.
विशेष म्हणजे, याआधीही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोरोनिल औषधावर संशय व्यक्त केला होता. ‘ज्या लोकांना बाबा रामदेव यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी हे औषध खरेदी करावे’, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती. मात्र, रामदेव बाबा यांनी कोरोनिल औषधाचे सेवन केल्यावर १०० टक्के कोरोना रुग्ण बरा होत, असा दावा केला होता. मात्र, हे औषध लाँच झाल्याचा काही तासांतच वादाच्या भोवऱ्यात सापडले. या औषधाच्या जाहिरातीवर आयुष्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.