HW News Marathi
Covid-19

…तर जानेवारीपासून महाराष्ट्रात लसीकरणाला सुरुवात करु – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या प्रतिक्षेतही सगळेच जण आहेत. दरम्यान, कोरोना लसी संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्सचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच, लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचेही टोपेंनी सांगितले आहे.

१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार,त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, असं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचं टोपे म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशात मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द केल्या. पण आपल्याला तसं काही करायची गरज नाही. मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तर सुट्टी रद्द होईल, असंही टोपेंनी सांगितलं.

लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी कामं राज्य सरकारनं करायची आहेत ती आम्ही करत आहोत. लॉजिस्टिक,डेटा सगळं आम्ही करत आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केलं आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल पण केंद्राने परवानगी दिली तर, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रूग्ण महाराष्ट्रात आढळले

News Desk

ठाकरे सरकारचा “ब्रेक द चेन”चा नारा ! आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk

पुण्यातून बाहेर पडायचे आहे ? वाचा ही प्रेस नोट

News Desk