मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे. वाजिदने अवघ्या ४२ वर्षाचे होते, वाजिदला किडनी इन्फेक्शनमुळे त्यांचा काल (३१ मे) रात्री मृत्यू झाला. गेले चार दिवस ते चेंबुरमधील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Maharashtra: Music composer & singer Wajid Khan passes away at a hospital in Mumbai. pic.twitter.com/PnWkX5RrCq
— ANI (@ANI) May 31, 2020
तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात बॉलिवूड विश्वात नाव कमावले. १९९८ मध्ये साजिद-वाजिद यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर चोरी चोरी, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड आणि दबंग अशा सुपरस्टार सलमानच्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक अल्बम बनवले.
Devastated with the news of the passing away of my brother Wajid of Sajid -Wajid fame. May Allah give strength to the family 🙏
Safe travels bro @wajidkhan7 you’ve gone too soon. It’s a huge loss to our fraternity. I’m shocked & broken .
Inna Lillahi wa inna ilayhi raji'un
— salim merchant (@salim_merchant) May 31, 2020
गायक म्हणून वाजिद खान यांनी २००८ मध्ये पार्टनरसाठी पहिले गाणे गायले. “हुड हुड दबंग”, “जलवा”, “चिंता ता चिता चिता” आणि “फेव्हीकॉल से” यासारखे ट्रॅक त्यांनी लोकप्रिय केले. संगीतकार सलीम मर्चंट यांनी वाजिद खान यांच्या निधनाची बातमी ट्वीटवरून दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.