HW News Marathi
महाराष्ट्र

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत केली वाहनांची जाळपोळ

गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यात आज (३१ जानेवारी) नक्षलवाद्यांनी सहा वाहनांची जाळपोळ केली आहे. वाहनांमध्ये ट्रॅक्टर्सचाही समावेश होता. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डोंगरगांव पोलीस चौकीजवळ कोरची तालुक्यात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ करण्यास सुरुवात केली होती.

नक्षलवाद्यांनी जवळपास १२ नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी मशिन्सना आग लावली. तसेच कुरखेडा-कोच्चि-चिचगद मार्गावर झाडे तोडून झाडांच्या फांद्या पसवरुन नक्षलवाद्यांनी रस्ता अडवला होता. या घटनेमागे उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळावर नक्षलवाद्यांशी संबंधित काही बॅनर्स आढळून आली होती. आ बॅनर्सनुसार हा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

नक्षलवाद्यांनी या परिसरातील २५ ते ३१ जानेवारी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात ”नक्षल सप्ताह” पाळण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान नक्षलवाद्यांनी बैठका, सभा आयोजित करण्यासहीत प्रचार आणि प्रसारही केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळांमध्ये ‘या’ तारखेला आजी आजोबा दिवस साजरा होणार; दीपक केसरकरांची माहिती

Aprna

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk

काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!

News Desk