HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राचा ॲाक्सिजन गुजरातला पळवण्याचा प्रयत्न ,कट आला उघडकीस !

नागपूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्याने विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

भिलाई येथून महाराष्ट्रातील नागपूरला वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र, हे टँकर्स गुपचूप गुजरातच्या दिशेने नेत असल्याचा प्रकार समोर आला. ५मेला दोन ऑक्सिजन टँकर्स गोंदिय जिल्ह्यातील देवरी बॉर्डरवर पकडण्यात आले तर ६ मेला दोन टँकर्स औरंगाबाद आणि जालना या दरम्यान पकडण्यात आले आहेत. हे चारही ऑक्सिजनचे टँकर्स हे नागपूर प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.

महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे तेथेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन तिथेकुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून राज्यभर रात्री ८ नंतर जमावबंदी, राज्याकडून गाईडलाईन जारी

News Desk

कोरोनामुळे रविवार असुनही मंत्र्यांच्या बैठका ,शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Arati More

सेना भवनावर हल्ला करण्याचा भाजपचा डाव होता ! शिवसेनेचा गंभीर आरोप

News Desk