HW News Marathi
महाराष्ट्र

“पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल!” नाना पटोले

पुणे | पुणे हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहिल. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने काम करा. पुणे जिल्ह्याबरोबरच २०२४ साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, पुणे जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक जिल्हा असून दुसऱ्यांना मागणार नाही, काँग्रेस येथे स्वबळावर लढेल, त्याची तयारी केली आहे. पुढचा काळ पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी चांगला काळ असेल. पक्ष संघटना मजबूत करा आपल्याला यश मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमा कंपन्या, बँका, बीएसएनएल सर्वकाही विकायला काढले आहे. शेतकरी, कामगार यांना संपवायला निघाले आहेत. हा देश ‘हम दो’ हमारे दो’ असे चारजण मिळून चालवतात हे जनतेला आता समजले आहे. केंद्रातील सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने जनजागृती अभियान हाती घेतले आहे. काँग्रेस सामान्य माणसाला केंद्रीभूत माणून विकास केला पण आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वकाही विकून टाकत आहे. काँग्रेसच्या काळात असलेला ३५० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. पेट्रोल डिझेल १०० च्या वर गेले. राज्यातील आघाडी सरकार सत्तेत येताच पहिला महत्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला. भाजपाच्या कर्जमाफीसारखं रांगेत उभे करून, वेगवेगळ्या याद्या करून, अनेकांना त्याचा लाभ मिळू नये म्हणून नियम, अटी लावल्या नाहीत तर सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी कर्जमाफी राबविली. शेतकऱ्यांना संकटात मोठी मदत केली असेही पटोले म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वेळा प्रत्येकाच्या येत असतात ; एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे”

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार झाले कोरोनामुक्त

News Desk

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

Aprna