HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव, रुग्णांची संख्या ५ वर

पुणे। जगभरात थैमान घालणा-या कोरोना व्हायरसने महाराष्ट्र हात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात ५ कोरोना ग्रस्त सापडले आहे. दुबईहून आलेल्या दाम्पत्यानंतर आता त्यांच्यासोबतच्या आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. या रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कोरोनाग्रस्त दाम्पत्याची नुकतेच दुबईवरून आले आहे. या दाम्पत्यांनी मुलीसह त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ओला कार चालकाचाही समावेश आहे. संबंधित दाम्पत्य नुकतेच दुबईहून आले होते. ते दुबईहून मुंबईला विमानाने आले. त्यानंतर मुंबईहून त्यांनी ओला करुन पुण्यापर्यंतचा प्रवास केला. या प्रवासात त्यांच्यासोबतच्या चालकालाही कोरोना झाला आहे.दरम्यान, हे पाच रुग्ण अनेकांना भेटले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे भव्य यात्रा महोत्सव

News Desk

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Aprna