HW News Marathi
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यात एका दिवसात ‘कोरोना’चे २८ नवे रुग्ण, एकूण संख्या १८१ वर

मुंबई | राज्यात आणखी २८ कोिवड १९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्याती एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८१ वर गेली आहे. या नवीन रग्णांमध्ये सवािधक २२ रुग्णा हे मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहते. इतर ४ रुग्ण पालघर – वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची कृती गंभीर आहे. दरम्यान, काल (२७ मार्च) काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो करोनामुळे झाल्याचे आज (२८ मार्च) निश्चित झाले. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे.

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्तींना घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण सस्थांत्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैयकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थानप करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कोरोनाबाधितांचा आकडा

  • मुंबई – ७३
  • पुणे – २०
  • पिंपरी-चिंचवड – १२
  • सांगली – २४
  • नागपूर – ११
  • कल्य़ाण-डोंबिवली – ७
  • नवी मुंबई – ६
  • ठाणे – ५
  • यवतमाळ – ४
  • वसई-विरार – ४
  • अहमदनगर – ३
  • पनवेल – २
  • सातारा – २
  • उल्हासनगर – १
  • पालघऱ – १
  • सिंधुदुर्ग – १
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १
  • कोल्हापूर – १
  • गोंदिया – १

राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या – १८१

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीतील हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना ‘नाथ प्रतिष्ठान’चा मदतीचा हात

swarit

जयकुमार गोरे हटावण्याची माण- खटावमधील सर्वपक्षीयांची मागणी 

News Desk

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

Aprna