HW News Marathi
Covid-19

राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर !

मुंबई। राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७५२ हे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ६० हजार ८३८ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहे. राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१८ जून) दिली.

 

राज्यात आता एकूण १ लाख २० हजार ५०४ वर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

अजित पवारांची झोपडपट्टीमुक्त पुण्याची घोषणा

News Desk

महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेशकडून मदतीचा हात ! ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा

News Desk