मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज सातत्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (३० सप्टेंबर) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १८ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १९ हजार १६३ रुग्ण हे ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहोचला आहे. तर राज्यातील अत्यंत दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी १० लाख ८८ हजार ३२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. म्हणजेच राज्यातील १० लाखांहुनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यातील विविध रुग्णायालयात तब्बल २ लाख ५९ हजार ३३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
Maharashtra reports 18,317 new #COVID19 cases, 481 deaths and 19,163 discharges today. Total cases in the state rise to 13,84,446, including 36,662 deaths and 10,88,322 discharges. Active cases stand at 2,59,033: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/KBsWa20pJu
— ANI (@ANI) September 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.