HW News Marathi
Covid-19

केडीएमसी शहरात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांच्या रांगा

मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर मुंबई, ठाणे पुणे भागात अडकले आहेत. त्या सर्वांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर मुंबई, ठाणे पुणे भागात अडकले आहेत. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांनी ठाण्यातील कल्याण डोंबिवली शहरातील खासगी दवाखान्यांच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झालेले चित्र दिसून आले आहे.

पुण्यात जवळपास १५ हजारहून अधिक स्थलांतरित नागरिकांचा सामावेश आहे. अनेक स्थलांतरित मंजुरांनी पुणे जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे घरी परतीचा अर्ज केला होता. या अर्जाची छाननी करून पुण्यात स्थलांतरितांची पहिली यादी तयार करण्यात आली. यात १५ हजार ५०२ परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परप्रांतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवाशांची संख्या अधिक आहे. उत्तर प्रदेशातील जवळपास ४ हजार ०४८ आणि बिहारमधील ३ हजार ८१० नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या ५८३ नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

News Desk

मुंबईतील सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार, महापौरांचा इशारा

News Desk

लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे !

News Desk